सर्व भक्तांच्या विनंतीवरून सामुदायिक सर्व वरांचे उद्यापन (सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार उजवणे). सर्व भक्तांना कळविणेत येते कि, सर्व वारांचे दि. २८/११/२०१६ रोजी उद्यापन करण्यात येणार आहे. तरी ज्या भक्तांना आपले वार उजविण्याचे आहे. त्यांनी मंदिराचे पुजारी यांचेकडे दक्षिणा देवून रीतसर पावती घ्यावी. व्यक्तीशा दक्षिणा ५२५/- रु. मर्यादित व्यक्तींना घेतले जाणार आहे. तरी आपली नावे लवकर नोंद करावीत. संपर्क : पुजारी श्री. अशोक भोरे मो. ९९७५४४१५१९.
कलशारोहन
     

दि ५,६ फेब्रुवारी २०१४ रोजी झालेला कलशारोहण हा जणू रावणेश्वर महादेव भक्तांच्या स्वप्नपूर्तीचा सोहळाच होता. मूळ एका लोखंडी छत्री खाली असलेले हे शिवलिंग १९९६ साली शिव मंदिरात प्रतिष्ठापीत झाले. त्यानंतर भाविकांच्या सहकार्यातून आणि श्री रावणेश्वर महादेवांच्या प्रेरणेने त्यावर शिखर उभारणीचा निर्णय झाला. कसबी कारागिरांनी शिल्पवैभव युक्त असे शिखर साकारले. आंध्रप्रदेशचे दिलीप शर्मांच्या पुरौहित्या खाली दोन दिवस भव्य कार्यक्रम झाला. पहिल्या दिवशी पुण्याहवाचन आणि देवतास्थापन झाले.

     १२१ घट स्थापनकरून रुद्र सूक्ताचा अभिषेक झाला. शिवलीलामृत ११ व्या अध्यायात सांगितल्या प्रमाणे अनुष्ठान पदधतीने हे अनुष्ठान झाले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कणेरी मठाचे उत्तराधिकारी स्वामींच्या हस्ते घंटा, डमरू च्या गजरात कलश शिखरावर प्रतिष्ठीत झाला आणि भक्तांनी हर हर महादेव चा एकच जयघोष केला. हवनाच्या पूर्णाहुती नंतर आरती आणि प्रसाद झाला. रात्री संगीताच्या कार्यक्रमात भाविकांच्या आनंद व्दिगुणीत झाला.

मंदिराची वेळ

१. मंदिर खुले होणेची वेळ सकाळी ६.०० वा.
२. मंदिर पुजेस सुरुवात सकाळी ७.०० वा.
३. सकाळची आरती सकाळी ८.३० वा.
४. सायंकाळ आरती सायं. ७.३० वा.
५. ॐ नम: शिवाय जप सायंकाळी ७.४५ ते ८.००
६. सकाळी १२.०० वा. पर्यंत गर्भद्वार खुले राहील.
७. सायंकाळी ४.०० नंतर गर्भद्वार बंद होईल
८. रात्री ९.०० वा नैवद्यनंतर गर्भद्वार बंद होईल.
९. रात्री १०.०० वा. मंदिर मुख्यद्वार बंद होईल
१०. दर सोमवारी सकाळी ७.०० वा. रुद्राभिषेक होईल.

पुजा संपर्क
१) लघुरुद्राभिषेक -
४०००/- रुपये
२) रुद्र एकाद्शनी अभिषेक -
१५००/- रुपये
३) रुद्राभिषेक -
३५१/- रुपये
४) सहस्त्र बिल्व – पत्र अर्चन पूजा -
१००१/- रुपये
५) दहीभात पूजा -
४०१/- रुपये
६) पंचामृत अभिषेक -
१०१/- रुपये
७) सामुदायिक अभिषेक -
५१/- रुपये
श्री रावणेश्वर आरती
Copyright © 2016 Shri Ravneshwar Mahadev Temple, Kolhapur All Rights Reserved. Developed By : Global Eye Technology