सर्व भक्तांच्या विनंतीवरून सामुदायिक सर्व वरांचे उद्यापन (सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार उजवणे). सर्व भक्तांना कळविणेत येते कि, सर्व वारांचे दि. २८/११/२०१६ रोजी उद्यापन करण्यात येणार आहे. तरी ज्या भक्तांना आपले वार उजविण्याचे आहे. त्यांनी मंदिराचे पुजारी यांचेकडे दक्षिणा देवून रीतसर पावती घ्यावी. व्यक्तीशा दक्षिणा ५२५/- रु. मर्यादित व्यक्तींना घेतले जाणार आहे. तरी आपली नावे लवकर नोंद करावीत. संपर्क : पुजारी श्री. अशोक भोरे मो. ९९७५४४१५१९.
कल्याण महोत्सव
      दि १०, ११ आणि १२ नोव्हेंबर २०१४ रोजी म्हणजे कार्तिक कु ४, ५, ६ ला श्री रावणेश्वर महादेवांचा श्री गंगा आणि श्री पार्वती मातेबरोबर विवाह होणार आहे. या दिवसात दि. १० रोजी देवता आवाहन स्थापन रुद्र अभिषेक, रुद्र, हवन क्रमार्चन असे विधी तर दुसऱ्या दिवशी सकाळी मृत्युंजय हवन तर संध्याकाळी आद्रा नक्षत्रावर देवांचा विवाह सोहळा संपन्न होईल. तिसऱ्या दिवशी सकाळी महागणपती, सुब्रम्हण्यम, सर्पसुक्त हवन, नक्षत्र शांती, नवग्रह शांती असे अनेक विधी होणार आहेत.

मंदिराची वेळ

१. मंदिर खुले होणेची वेळ सकाळी ६.०० वा.
२. मंदिर पुजेस सुरुवात सकाळी ७.०० वा.
३. सकाळची आरती सकाळी ८.३० वा.
४. सायंकाळ आरती सायं. ७.३० वा.
५. ॐ नम: शिवाय जप सायंकाळी ७.४५ ते ८.००
६. सकाळी १२.०० वा. पर्यंत गर्भद्वार खुले राहील.
७. सायंकाळी ४.०० नंतर गर्भद्वार बंद होईल
८. रात्री ९.०० वा नैवद्यनंतर गर्भद्वार बंद होईल.
९. रात्री १०.०० वा. मंदिर मुख्यद्वार बंद होईल
१०. दर सोमवारी सकाळी ७.०० वा. रुद्राभिषेक होईल.

पुजा संपर्क
१) लघुरुद्राभिषेक -
४०००/- रुपये
२) रुद्र एकाद्शनी अभिषेक -
१५००/- रुपये
३) रुद्राभिषेक -
३५१/- रुपये
४) सहस्त्र बिल्व – पत्र अर्चन पूजा -
१००१/- रुपये
५) दहीभात पूजा -
४०१/- रुपये
६) पंचामृत अभिषेक -
१०१/- रुपये
७) सामुदायिक अभिषेक -
५१/- रुपये
श्री रावणेश्वर आरती
Copyright © 2016 Shri Ravneshwar Mahadev Temple, Kolhapur All Rights Reserved. Developed By : Global Eye Technology