सर्व भक्तांच्या विनंतीवरून सामुदायिक सर्व वरांचे उद्यापन (सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार उजवणे). सर्व भक्तांना कळविणेत येते कि, सर्व वारांचे दि. २८/११/२०१६ रोजी उद्यापन करण्यात येणार आहे. तरी ज्या भक्तांना आपले वार उजविण्याचे आहे. त्यांनी मंदिराचे पुजारी यांचेकडे दक्षिणा देवून रीतसर पावती घ्यावी. व्यक्तीशा दक्षिणा ५२५/- रु. मर्यादित व्यक्तींना घेतले जाणार आहे. तरी आपली नावे लवकर नोंद करावीत. संपर्क : पुजारी श्री. अशोक भोरे मो. ९९७५४४१५१९.
रावणेश्वर महादेव महात्म्य
जगा आगळी काशी म्हणवणाऱ्या अशा या करवीर क्षेत्राला सर्व प्रकारची समृद्धी लाभलेली असून ही समृद्धी फक्त भौतिक आणि सांस्कृतिक नव्हे तर अध्यात्मिक आणि थोर विभूतींच्या आशीर्वादाची व पद्स्पर्शाची पण आहे. करवीर क्षेत्राच वर्णन करताना करवीर महात्म्यात म्हटलय कि

“करवीरे जलंशंभु पशाणस्तु जनार्दना

सिकता मुनया सर्वेतरवा: सर्वदेवता”

म्हणजेच करवीर क्षेत्रात जलरूपाने शंकर, पाषाणरूपाने विष्णू तर वाळूच्या कणरुपात ऋषीमुनी आणि वृक्ष रुपात सर्व देवता निवास करतात. अशा या करवीर क्षेत्री अनेक थोर विभूतीना श्री जगदम्बेच दर्शन घेतल आणि या क्षेत्री आपली आठवण म्हणून लिंगे किंवा तीर्थ स्थापन केली. श्री विष्णूच्या दहा अवतारांपैकी मत्स्य, कूर्म, वराह आणि वामन हे चार अवतार वगळता इतर सर्व अवतार या करवीर क्षेत्री येऊन गेल्याची कथा पुराणांमध्ये पहावयास मिळते.
सविस्तर वाचा

सोमवार दिनांक ०३/०४/२०१७ ची पूजा
व्हिडिओ गॅलरी
मंदिराची वेळ

१. मंदिर खुले होणेची वेळ सकाळी ६.०० वा.
२. मंदिर पुजेस सुरुवात सकाळी ७.०० वा.
३. सकाळची आरती सकाळी ८.३० वा.
४. सायंकाळ आरती सायं. ७.३० वा.
५. ॐ नम: शिवाय जप सायंकाळी ७.४५ ते ८.००
६. सकाळी १२.०० वा. पर्यंत गर्भद्वार खुले राहील.
७. सायंकाळी ४.०० नंतर गर्भद्वार बंद होईल
८. रात्री ९.०० वा नैवद्यनंतर गर्भद्वार बंद होईल.
९. रात्री १०.०० वा. मंदिर मुख्यद्वार बंद होईल
१०. दर सोमवारी सकाळी ७.०० वा. रुद्राभिषेक होईल.

पुजा संपर्क
१) लघुरुद्राभिषेक -
४०००/- रुपये
२) रुद्र एकाद्शनी अभिषेक -
१५००/- रुपये
३) रुद्राभिषेक -
३५१/- रुपये
४) सहस्त्र बिल्व – पत्र अर्चन पूजा -
१००१/- रुपये
५) दहीभात पूजा -
४०१/- रुपये
६) पंचामृत अभिषेक -
१०१/- रुपये
७) सामुदायिक अभिषेक -
५१/- रुपये
श्री रावणेश्वर आरतीCopyright © 2016 Shri Ravneshwar Mahadev Temple, Kolhapur All Rights Reserved. Developed By : Global Eye Technology